Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मृताच्या हातापायांत 11 खिळे ठोकले

मृताच्या हातापायांत 11 खिळे ठोकले

सीतापूर,

Murder case, उत्तर प्रदेशातील सीतापूरच्या संदाना पोलीस ठाणे परिसरात १३ मे रोजी उघडकीस आलेल्या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडवली. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी नागेंद्रला मलिहाबाद येथून अटक केली असून, हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, १३ मे रोजी संदाना परिसरातील नदीकाठाजवळील जंगलातून मृतदेह आढळला. मृत व्यक्तीची ओळख सत्यनारायण यादव उर्फ "परदेशी बाबा" अशी झाली. पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा नोंदवला आणि चौकशी सुरु केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी नागेंद्रने कबुल केले की, परदेशी बाबा गेल्या १७-१८ वर्षांपासून त्याच्या आईवर उपचार करत होते. बाबांनी कथितपणे काळ्या जादूच्या प्रभावाखाली आरोपीच्या आईला अडकवले असल्याचा त्याला संशय होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी या मुद्द्यावरून आरोपी आणि मृतक यामध्ये वाद झाला होता.आरोपीच्या सांगण्यानुसार, तो गेल्या दोन महिन्यांपासून हत्येचा कट रचत murder case, होता. घटनेच्या दिवशी, पैसे घेण्याच्या उद्देशाने आरोपीने परदेशी बाबांना दुचाकीवरून जंगलात बोलावले. तिथे त्याने चाकूने सपासप वार केले आणि गळा चिरून हत्या केली.पोलिसांच्या तपासात हे देखील उघडकीस आले की, आरोपीने मृतकाच्या हातापायांत ११ खिळे ठोकले, जेणेकरून मांत्रिकाचा आत्मा भटकणार नाही, असा त्याचा विश्वास होता. हत्येसाठी वापरलेले चाकू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे, बुट, हातमोजे आणि इतर वस्तू जाळल्याचेही कबुल केले.या भीषण घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ पसरली असून, पोलिसांनी घटनास्थळी तैनात राहून पुढील तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur