Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नासा 'अ' संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नासा 'अ' संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

- संघ उप-उपान्त्यफेरीत

- खासदार क्रीडा महोत्सव युवा बास्केटबॉल स्पर्धा

नागपूर,

Khasdar krida mahotsav खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत शिवाजीनगर येथील एस.एन.जी. मैदानावर सुरू असलेल्या युवा बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात नासा-अ संघाने सलग दोन साखळी सामने जिंकत थेट उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत प्रवेश केला.

तर जीकेएम-अ, एनबीवायएस आणि फिनिक्स या संघांनी दमदार कामगिरी उप-उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले. स्पर्धेत खेळाडूंनी वेगवान खेळ, अचूक पासिंग आणि प्रभावी शूटिंगचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक सामने एकतर्फी झाले, तर काही सामन्यांमध्ये अखेरपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.

मुलांच्या गटात एनबीवायएसचा दणदणीत विजय

एनबीवायएस संघाने पीएलएससी संघावर असा एकतर्फी विजय मिळविला. विजयी संघाकडून शंतनू गुडधे याने गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पीएलएससीकडून सोहम डी. याने ३ गुण मिळविले. सामन्यात एनबीवायएसने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांना सावरू दिले नाही.

Khasdar krida mahotsav जीकेएम-अ संघाने एसकेएम संघाचा ५४-३ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. गीतिश जितवोडे याने १८ गुण नोंदवत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. एसकेएमकडून ओजस रिंढे याने ३ मिळविले. पहिल्या दोन क्वार्टरमध्येच जीकेएम-अ ने प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत सामना आपल्या बाजूने झुकविला. एसकेएस-अ संघाने एसकेएम-ब संघावर ५४-२ असा मोठा विजय मिळविला. अक्षदा धर्मे हिने १२ गुणांची कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर एसकेएम-ब संघाकडून आयुषी वर्मा हिने २ गुणांची नोंद केली. ईएसकेएमची खेळाडू राजलक्ष्मी रोंघे १६ गुण पटकावित संघाला विजय मिळवून दिला. पीएलएससीच्या लभ्या टेंभरे हिने २ गुण प्राप्त केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur