Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाटकप्रेमी सज्ज व्हा! 'दवंडीवाला' उद्या रंगणार

नाटकप्रेमी सज्ज व्हा! 'दवंडीवाला' उद्या रंगणार

नागपूर,

Davandiwala आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे रविवार, दि. 31 मे 2026 रोजी सादर होणाऱ्या हलबी भाषिक प्रायोगिक नाटक "दवंडीवाला" संदर्भात आयोजकांनी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी आपले तिकीट सोबत आणणे आवश्यक असून तिकिटाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, चार वर्षांवरील सर्व मुलांसाठी तिकीट अनिवार्य राहणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ₹1000, ₹500, ₹300 आणि ₹200 मूल्याची तिकिटे ऑनलाईन बुक करणाऱ्या काही प्रेक्षकांपर्यंत तिकिटे पोहोचविणे शक्य झाले नसल्यास त्यांच्यासाठी सभागृहाबाहेर स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित प्रेक्षकांनी तेथून आपली तिकिटे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आसन व्यवस्थेबाबतही आयोजकांनी माहिती दिली असून पहिली रांग प्रमुख पाहुणे आणि आयोजकांच्या कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. दुसरी आणि तिसरी रांग ₹1000 तिकीटधारकांसाठी राखीव असेल. त्यानंतरच्या रांगांमध्ये ₹500, ₹300 आणि ₹200 तिकीटधारकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. Davandiwala दरम्यान, पत्रकार बांधवांना त्यांचे ओळखपत्र तपासून आयोजकांकडून प्रवेश पास देण्यात येणार आहेत. पत्रकारांनी उपलब्धतेनुसार ₹500, ₹300 किंवा ₹200 तिकीटधारकांसाठी असलेल्या जागांवर बसून वार्तांकन करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. नाटकाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सौजन्य: श्रीकांत पावनीकर, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur