तभा वृत्तसेवा
अमरावती,
दिवाळीला शहरातल्या नागरिकांना नियम पाळून फटाके फोडावे लागणार आहे. पोलिस आयुक्तालयाने तशी नियामावली बुधवारी जाहिर केली.
खरेदी करताना घ्यावी काळजी
दिवाळीच्या पूर्वी बाजारात गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेवून पॉकेटमार, बॅग लिप्टर, पैसे मोजुन देतो असे म्हणुन ओळख काढणारे भामटे यांचेद्वारे चोरी व फसवणुकीची घटना होवु शकते. तसेच गर्दीचा फायदा घेवुन मोटार सायकल चोरीच्या घटना घडु शकतात तरी आपल्या मोटार सायकली हैंडल लॉक करुन अधिकृत पार्कीगचे ठिकाणी ठेवाव्या. तसेच महिलांनी दागीने घालुन गर्दीचे ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच नागरीकांनी आपले मौल्यवान वस्तुची काळजी घ्यावी.
पोलिसांचा राहणार बंदोबस्त
दिवाळी निमित्त पोलिसांतर्फे विविध ठिकाणी नाकाबंदी करुन चेकींग करण्यात येईल. तसेच गर्दीचे ठिकाणी गणवेषात तसेच साध्या पोषाखात महिला व पुरुष अंमलदारा मार्फतीने पायी तसेच मोटार व जिप गाडीने पेट्रोलींग करण्यात येणार आहे.
विक्रेत्यांनी नियम पाळावे
फटाके विक्रेत्यांनी नियमांचे पालन करुनच फटाके विक्रीचा व्यवसाय करावा. परवान्यात नेमुन दिलेल्या जागे वरुनच फटाके विक्री करावी. अग्नीजन्य वस्तु दुकाना पासुन दुर ठेवाव्यात. दोन फटाक्याचे दुकानामध्ये नियमा प्रमाणे अंतर ठेवावे. अग्निशमनाचे साहीत्य जसे कि, वाळु भरलेली बादली, पापी, फायर एक्श्टींग्युशर इत्यादी साहित्य अद्यावत परिस्थितीमध्ये उपलब्ध ठेवावे. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके साठवुन ठेवु नये. त्यासाठी विहीत नियमात दिल्या प्रमाणे गोडावून मध्येच साठा करावा. सदरचे गोडावुन हे मानवी वस्तीपासुन दुर व अग्निजन्य पदार्थापासुन सुरक्षीत असावे. सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. विनापरवाना फटाके विक्री कोणीही करु नये. विनापरवाना फटाका विक्री करताना आढळून आल्यास भारतीय विस्फोटक कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी दक्षता घ्यावी.

