Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा नाही

ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा नाही

बीड,

ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नसून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही, अशी शपथ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली आहे.

त्या दसरा मेळव्याच्या निमित्ताने भगवान गडावर बोलत होत्या.

जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षण असेल यावर उठवणार आहे. या दोन्ही समाजात भांडण लावण्याचे कारस्थान सुरू आहे. मराठा समाज शिक्षणाचे तर ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो. दोघे मिळूनच बहुजन समाज असून, या समाजाची वज'मूठ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आपल्या दौर्‍यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकर्‍यांना मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा आदी मुद्दे असेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ घेते, असा मोठा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur