Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर 'स्टार्क' प्रहार!

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर 'स्टार्क' प्रहार!

मॅके,

Stark makes history मॅके येथे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक नवा इतिहास रचला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरवत स्टार्कने एकट्याने बांगलादेशच्या ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या धडाकेबाज कामगिरीसह तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा जागतिक गोलंदाज बनला आहे.मिचेल स्टार्कने डब्ल्यूटीसीमध्ये ५६ सामने खेळून अबपर्यंत २३० बळी मिळवले आहेत. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्याच नॅथन लायनला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर ५७ सामन्यांत २२५ बळी आहेत. याच सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार पॅट कमिन्सने ३ बळी घेत लायनसोबत २२५ बळींची बरोबरी साधली. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात २०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारे हे तिघेच गोलंदाज असून भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन १९५ बळींसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात स्टार्कने अवघ्या २२ चेंडूंमध्ये ५ बळी घेण्याची किमया करत सर्वात जलद पाच बळी घेणाऱ्यांच्या एलिट यादीत पाचवे स्थान मिळवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १५ चेंडूंमध्ये पाच बळी घेण्याचा जागतिक विक्रमही स्टार्कच्याच नावावर आहे, जो त्याने २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला होता. या यादीत अर्नी टॉशॅक दुसऱ्या तर स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या स्थानावर आहे. सामन्याचा विचार करता, पहिला कसोटी सामना गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात दमदार पुनरागमन केले. स्टार्कचे ६, पॅट कमिन्सचे ३ आणि जोश हेझलवूडच्या १ बळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ६४ धावांवर गुंडाळला. बांगलादेशकडून शरीफुल इस्लामने १९ चेंडूंत सर्वाधिक १४ धावा केल्या, तर संघाचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur