Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पहिल्याच चेंडूवर विकेट; स्टार्कचा ऐतिहासिक विक्रम!

पहिल्याच चेंडूवर विकेट; स्टार्कचा ऐतिहासिक विक्रम!

मॅके,

Starcs historic record ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ ऑगस्ट रोजी मॅके येथे सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.

दिवसअखेर तब्बल १८ फलंदाज बाद झाले. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ६४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या डावात सहा बळी घेत शानदार कामगिरी केली.

सामन्याच्या सुरुवातीलाच स्टार्कने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने बांगलादेशचा सलामीवीर शादमन इस्लामला कॅमेरॉन ग्रीनच्या हाती झेलबाद केले. कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची स्टार्कची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे या विक्रमात त्याने वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज पेड्रो कॉलिन्सला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

यापूर्वी स्टार्क आणि कॉलिन्स यांनी प्रत्येकी तीन वेळा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. मात्र, शादमन इस्लामची विकेट घेत स्टार्कने चौथ्यांदा ही कामगिरी केली. स्टार्कने याआधी दिमुथ करुणारत्ने, रॉरी बर्न्स आणि यशस्वी जैस्वाल यांना कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले आहे. दुसरीकडे, कॉलिन्सने तिन्ही वेळा बांगलादेशचा माजी फलंदाज हनान सरकारची विकेट घेत हा विक्रम नोंदवला होता.

कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क चार वेळा अव्वल आहे. पेड्रो कॉलिन्स तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडचे जेफ्री अर्नोल्ड, न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली, भारताचे कपिल देव आणि श्रीलंकेचे सुरंगा लकमल यांनी प्रत्येकी दोन वेळा हा पराक्रम केला आहे.

या सामन्यात स्टार्कने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक वेळा विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकले. अँडरसनने कसोटीच्या पहिल्या षटकात आठ वेळा विकेट घेतली होती, तर स्टार्कने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नवव्यांदा ही कामगिरी केली.

कसोटी डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याच्या बाबतीतही स्टार्कची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत पाच वेळा ही कामगिरी केली असून या यादीत तो न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीच्या मागे आहे. हॅडलीने सहा वेळा कसोटी डावाच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur