Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानमध्ये रक्तरंजित; पाच ठार, नवविवाहित जोडप्याची हत्या

पाकिस्तानमध्ये रक्तरंजित; पाच ठार, नवविवाहित जोडप्याची हत्या

इस्लामाबाद,

Bloodshed in Pakistan पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरनाई जिल्ह्यातील शहरग भागात ही घटना घडली असून सशस्त्र व्यक्तींनी स्थानिक नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी शेख मुसा बाबा चौकाजवळ तात्पुरता तपासणी नाका उभारून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली होती. यावेळी काही स्थानिकांनी या तपासणीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर गोळीबारात झाले. Bloodshed in Pakistan या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी व्यक्तीचा क्वेट्टाकडे नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये स्थानिक धार्मिक नेते मौलवी झाहिद शाह यांच्यासह पाच जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे बलुचिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. Bloodshed in Pakistan दुसरीकडे, पाकिस्तानच्या कराची शहरातही एक धक्कादायक घटना घडली असून न्यायालयातून परतणाऱ्या नवविवाहित जोडप्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदाबाद परिसरातील आरसीडी मैदानाजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

पोलिस तपासात समोर आले आहे की, हे जोडपे कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता विवाहबद्ध झाले होते आणि त्यांनी आपल्या लग्नाची कायदेशीर नोंदही न्यायालयात केली होती. Bloodshed in Pakistan प्राथमिक तपासानुसार या हत्येमध्ये महिलेच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून आरोपींचा शोध सुरू आहे. या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तानमध्ये कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur