Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानात पावसाचा महाप्रलय!

पाकिस्तानात पावसाचा महाप्रलय!

इस्लामाबाद,

Catastrophic deluge in pakistan पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

राजधानी इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर आणि अटॉकसह विविध भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी घरे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडीतील अनेक परिसर पाण्याखाली गेले असून मरे रोड, कचरी चौक तसेच पेशावरमधील प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली असून काही भागांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य राबवण्यात अडथळे येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.

पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीने अनेक भागांतील वीजपुरवठा तात्पुरता बंद केला आहे. दरम्यान, अटॉक जिल्ह्यातील पिंडीघेब शहराला सर्वाधिक फटका बसला असून मुसळधार पावसामुळे मल्लाहवाला गुंडा कास धरण फुटल्याने संपूर्ण परिसरात पाणी पसरले आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur