Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पांढरकवड्यात अवकाळी पावसाचा तडाखा

पांढरकवड्यात अवकाळी पावसाचा तडाखा

झाडे कोसळली, वीजतारा तुटल्या, घरांचे नुकसान

पांढरकवडा,

Unseasonal rain in Pandharkawada पांढरकवडा शहराला रविवार, 31 मे रोजी अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाèयाने अक्षरशः झोडपून काढले.

अचानक आलेल्या पाऊस व वादळी वाèयामुळे शहरातील अनेक भागांत मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाèयाच्या तडाख्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर तसेच वाहनांवर कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहराच्या विविध भागांत 25 ते 30 चारचाकी आणि 40 ते 50 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले.

Unseasonal rain in Pandharkawada शहराच्या काही भागांत घरांवरील टिनपत्रे उडून गेल्याने नागरिकांची मोठीच धावपळ झाली. अनेक भागांत वीजतारा तुटल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. वीज विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर झाडांच्या फांद्या आणि विविध साहित्य पडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. सुदैवाने जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur