Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाणी नव्हे, जंतूंचा पुरवठा! आजणसऱ्यात गावाकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

पाणी नव्हे, जंतूंचा पुरवठा! आजणसऱ्यात गावाकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

*ग्रामसेवक प्रशासक यांना निलंबित करुन फौजदारी गुन्हे दाखल करा,

गावाकऱ्यांची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

डॉ.संदीप लोंढे

आजनसरा : Ajansara: Contaminated Water जिल्ह्यातील आजणसरा येथे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

गावकऱ्यांना व नळाद्वारे पिण्यासाठी पाणी नव्हे, तर थेट जिवंत जंतूंचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गाठून ग्रामसेवक व प्रशासकाला तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे,

आजणसरा येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्यातून जिवंत जंतू निघत आहेत. या दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक दोघेही या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुरावा व्हायरल, गावात दहशत गावकऱ्यांनी नळातून जंतू येतानाचा व्हिडिओ शूट करून Instagram व WhatsApp वर टाकताच तो वाऱ्यासारखा पसरला. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण असून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवण्याची मागणी होत आहे, ग्रामस्थांनी तक्रार अर्जात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 च्या कलम 45 व 49 नुसार स्वच्छ पाणी पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ नोकरीतून निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार स्वच्छ पाणी हा जीवनाचा मूलभूत हक्क असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे, या प्रकाराला"प्रशासक व ग्रामसेवक दोघेही दोषी आहेत. गुन्हा दाखल करा, अन्यथा संपूर्ण गावकरी रस्त्यावर उतरून शासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडतील," असा सज्जड इशारा आजणसराच्या ग्रामस्थांनी दिला आहे, सदर प्रकार गौरव पेटकर या युवकाने मोठ्या धाडसाने समोर आणला आहे, आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणाची किती गंभीर दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur