Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पावसाची दिवसभर हजेरी

पावसाची दिवसभर हजेरी

नागपूर,

Nagpur-rain : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर बुधवारी पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी मात्र पावसाने दिवसभर चांगलेच ओलेचिंब केले.

त्यामुळे खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. थांबून-थांबून पाऊस दिवसभर पडत होता. हवामान विभागाने सायंकाळी ५.३० पर्यंत २९.० मिमी पावसाची नोंद केली. पावसामुळे तापमानही खाली आले. शहराचे कमाल तापमान ३०.४ अंश नोंदविले गेले.

बुधवारी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालयाला सुटी दिल्यानंतर दिवसभर पाऊस पडलाच नाही, तर सायंकाळनंतर तुरळक प्रमाणात पडला. हवामान विभागाने दिलेला इशारा फसला. मात्र, गुरुवारी आलेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटविली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur