Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फार्महाऊसच्या नावावर डाॅक्टरला 26 लाखांचा गंडा

फार्महाऊसच्या नावावर डाॅक्टरला 26 लाखांचा गंडा

अनिल कांबळे

नागपूर,

Fraud Against a Doctor फार्म हाऊससाठी शेतजमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका डाॅक्टरची 26 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सीताबर्डी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

डाॅ. आनंद गणेश नाशिककर (67, भरतनगर) हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना फार्महाऊस तयार करण्यासाठी जमिनीची आवश्यकता हाेती.

Fraud Against a Doctor दरम्यान, वर्तमानपत्रातील किंवा इतर माध्यमांतील जाहिरात पाहून त्यांनी 4 एप्रिल 2007 राेजी संस्कृती संकुल, झाशी राणी चाैक येथे आराेपी हाजी बशीर हाजी सत्तार अशरी (टीचर्स काॅलनी, जाफरनगर) याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आराेपी हाजी बशीर याने डाॅ. नाशिककर यांना काही शेतजमिनी दाखविल्या. जमिनी खरेदी करण्यासाठी नाशिककर यांनी आराेपीला वेळाेवेळी 26 लाख 65 हजार रुपये दिले. परंतु, रक्कम घेऊनही आराेपीने नाशिककर काेणतीही शेतजमीन खरेदी करून दिली नाही. त्यांनी जेव्हाही जमिनीबाबत विचारणा केली, तेव्हा आराेपीने नेहमी टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डाॅ. नाशिककर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पाेलिसांनी आराेपी हाजी बशीर हाजी सत्तार अशरीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तलावात पाेहताना तरुणाचा बुडून मृत्यू

नागपूर : गिट्टीखदान पाेलिस ठाणे हद्दीतील गाेरेवाडा तलावात पाेहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरिओम रामप्यारे यादव (27, जयदुर्गा साेसायटी, उज्ज्वलनगर, झिंगाबाई टाकळी) असे मृताचे नाव आहे.

माहितीनुसार, हरिओम हा शनिवारी सायंकाळी गाेरेवाडा तलावात पाेहण्यासाठी गेला हाेता. मात्र, पाेहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तलावात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच गिट्टीखदान पाेलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हरिओमचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढला आणि पुढील उत्तर शवविच्छेदनासाठी मेयाे रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मृत तरुणाची आई चंद्रमा रामप्यारे यादव यांनी दिलेल्या माहितीवरून, वैद्यकीय सूचनेवरून पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur