Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फिफाच्या लाल कार्डने लाखोंचा पिझ्झा फुकट!

फिफाच्या लाल कार्डने लाखोंचा पिझ्झा फुकट!

वॉशिंग्टन,

FIFA red card leads to a pizza फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये मैदानावरील थरारासोबतच एक वेगळीच घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेच्या खेळाडू फोलोरिन बालोगन याला सामन्यादरम्यान मिळालेल्या रेड कार्डमुळे डॉमिनोज पिझ्झाने तब्बल १० लाख डॉलर्स, म्हणजेच सुमारे ९ कोटी ५१ लाख रुपयांचे पिझ्झा मोफत वाटण्याची घोषणा केली आहे.

या निर्णयामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. १ जुलै २०२६ रोजी फिफा वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ ३२ मध्ये अमेरिका आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यात रंगतदार सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलोरिन बालोगन याला रेड कार्ड दाखवण्यात आले. बोस्नियाच्या तारिक मुहरेमोविचविरुद्ध केलेल्या आव्हानानंतर व्हीएआर तपासणी करण्यात आली आणि पंचांनी त्याला मैदानाबाहेर जाण्याचा आदेश दिला.

या विश्वचषकादरम्यान डॉमिनोजने "इमर्जन्सी पिझ्झा" नावाची खास मार्केटिंग मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनुसार, अमेरिकन संघातील कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत रेड कार्ड मिळाल्यास चाहत्यांना मोफत पिझ्झा देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. बालोगनला रेड कार्ड मिळताच कंपनीने तात्काळ आपले वचन पूर्ण करत ऑफर लागू केली. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीने काही अटी निश्चित केल्या आहेत. १० जून २०२६ रोजी युरोपियन वेळेनुसार रात्री १२ वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केलेल्या चाहत्यांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे. नोंदणी केलेल्या ६० हजारांहून अधिक ग्राहकांना एक मिडीयम आकाराचा टू-टॉपिंग पिझ्झा मोफत देण्यात येणार आहे. तसेच ही ऑफर २ ऑगस्ट २०२६ पर्यंत वैध असणार आहे. मैदानावरील एका रेड कार्डने डॉमिनोजच्या या मोहिमेला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. फुटबॉलमधील अनपेक्षित निर्णयामुळे हजारो चाहत्यांसाठी हा क्षण खास ठरला असून, अनेकांसाठी हे रेड कार्ड अक्षरशः 'चविष्ट गिफ्ट' बनले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur