Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसांना नेहमी गुंगारा देणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांना नेहमी गुंगारा देणाऱ्या दोघांना अटक

अनिल कांबळे,

नागपूर,

Burglary-accused : घर बंद असल्याचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुमित गणपत मेश्राम (१९, नारा गाव, जरीपटका) आणि ध्रुव राजेश बिरबल (२०, टिमकी, तहसील) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी कुख्यात चोर असून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. शेवटी कळमना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम साईनगर, कळमना येथील रहिवासी राजू केशवराव बुटके (५७) हे २३ जूनला आपल्या कुटुंबासह चुलतभावाच्या लग्नासाठी गुमगाव येथे गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील १५ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, कॅमेरा व लॅपटॉप असा ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बुटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान कळमणा ठाणेदार प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सुमित मेश्राम ध्रुव बिरबल या दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur