Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात 'लर्न अँड अर्न' स्टॉल्स

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात 'लर्न अँड अर्न' स्टॉल्स

नागपूर, (कामठी)

Seth Kesarimal Porwal College सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी 'लर्न अँड अर्न' संकल्पनेअंतर्गत स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले.डॉ. रेणू तिवारी व डॉ. रेणुका रॉय यांच्या हस्ते स्टॉल्सचे उद्घाटन झाले.

अध्यक्षस्थानी डॉ. स्वप्निल दहाट होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. हुसेन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वंजारी, सुपरवायझर मेंढे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल्स उभारून आपल्या कल्पकतेचे व कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आत्मविश्वास व स्वावलंबनाची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमाचे आयोजन प्रा. पुडके व डॉ. हिना कौसर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

सौजन्य: प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur