Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'प्रहार' अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

'प्रहार' अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

मुंबई,

Mumbai monsoon राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावत पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत केल्याचे चित्र समोर आले आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.

अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

मुंबईतील दादर परिसरात वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे झाड वाहनावर कोसळल्याची घटना घडली असून, यामध्ये वाहनाचे नुकसान झाले आहे. कुर्ला, सायन सर्कल आणि अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने तो तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीतही पावसाचा फटका बसला असून, सोसायटीतील अनेक घरांमध्ये रात्री पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांना रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी परिस्थिती अजूनही पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दादर, माटुंगा, अंधेरी, कुर्ला आणि सायन या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता कायम असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. फक्त मुंबईच नव्हे तर राज्याच्या विविध भागांमध्येही मुसळधार पावसाचा परिणाम दिसून येत आहे.

पुणे शहरातही मुसळधार Mumbai monsoon पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. खामगाव, शेगाव आणि संग्रामपूरसह विविध भागांतही मुसळधार पाऊस झाला असून ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे.दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात असून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे चिंता देखील वाढली आहे. राज्यभरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur