Dailyhunt
प्रवाशांनो सावधान...दीड महिन्यांसाठी वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचे मार्ग बदलले

प्रवाशांनो सावधान...दीड महिन्यांसाठी वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचे मार्ग बदलले

नवी दिल्ली,

Vande Bharat and Shatabdi trains routes changed उत्तर रेल्वेने कानपूर-कानपूर ब्रिज लेफ्ट बँक सेक्शनवर ४२ दिवसांचा मेगा ब्लॉक लागू केला आहे. हा ब्लॉक २ एप्रिलपासून १३ मेपर्यंत चालेल आणि दररोज अंदाजे ८ तास सुरू राहील.

या काळात रेल्वे पूल क्रमांक ११० वर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व आधुनिकीकरणाची कामे केली जातील. दिल्ली, कानपूर किंवा लखनौ दरम्यान प्रवास करण्याची योजना असलेल्यांसाठी ही खबर अत्यंत महत्त्वाची आहे. मेगा ब्लॉकच्या काळात वंदे भारत आणि शताब्दीसह अनेक प्रीमियम गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तसेच काही गाड्या संपूर्णपणे रद्द केल्या गेल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिज क्रमांक ११० वर स्टीलच्या पन्हळींच्या जागी एच-बीम स्लीपर्स बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे रुळांची मजबुती वाढेल आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल. या काळात कानपूर, लखनौ, झाशी, रायबरेली, सीतापूर आणि कासगंज दरम्यान धावणाऱ्या अनेक मेमू आणि पॅसेंजर गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द राहतील. तसेच, अनेक मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे किंवा त्या काही स्थानकांवर थांबणार नाहीत.

विशेषत: नवी दिल्ली-लखनौ शताब्दी एक्सप्रेस आणि आनंद विहार-अयोध्या कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस या प्रमुख गाड्यांचा मार्ग बदलला गेला असून, या गाड्या आता कानपूरसह अनेक प्रमुख स्थानके वगळून मोरादाबादमार्गे धावतील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडे जाणाऱ्या अनेक गाड्या पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहेत, परिणामी प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur