Dailyhunt
पुण्यात भरदिवसा अंधार! अवकाळी पावसाचा मारा, रस्ते पाण्याखाली!

पुण्यात भरदिवसा अंधार! अवकाळी पावसाचा मारा, रस्ते पाण्याखाली!

पुणे,

Unseasonal rains hit Pune पुणे शहरात आज दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला असून, अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम दिसत आहे. शहरातील जंगली महाराज रस्ता एका दीड फूट पाण्याखाली बुडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

पावसामुळे दिवसभर अंधाराची स्थिती निर्माण झाली असून, काही वाहनचालकांनी हेडलाईट जाळून वाहतूक चालवावी लागली.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही जोरदार पाऊस पडत असून, काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. हवामान अभ्यासक के.एस. होसाळीकर यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस, सोसाट्यासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट याची नोंद आहे. पुण्यात सध्या दिसणारा पाऊस ही स्थिती म्हणजे राज्यातील हवामानातील 'विंड डिस्कन्टिन्यूटी'चा परिणाम आहे. ही परिस्थिती पुढील दोन-तीन दिवस टिकेल, असे ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur