Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राहुल बोंद्रे यांचा २२ सप्टेंबरला भाजपमध्ये पक्षप्रवेश?

राहुल बोंद्रे यांचा २२ सप्टेंबरला भाजपमध्ये पक्षप्रवेश?

चिखली,

Buldhana Pakshpraveshकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आता २२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आल्याने या चर्चेला अधिकृत घोषणेपूर्वीच वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे चिखलीच्या राजकारणात राहुल बोंद्रे आणि विद्यमान भाजप आमदार श्वेताताई महाले यांच्यात यापूर्वी अनेकदा राजकीय सामना झाला आहे.

बोंद्रे यांच्यासोबत त्यांचे समर्थक व कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, याबाबतची स्पष्टता पक्षप्रवेश सोहळ्यावेळी होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरच्या या पक्षप्रवेशाकडे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur