Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'राजा शिवाजी' लवकरच ओटीटीवर

'राजा शिवाजी' लवकरच ओटीटीवर

मुंबई

Raja Shivaji अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या मराठी चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत इतिहास रचलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू असून, हा चित्रपट लवकरच घरबसल्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज होत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट 26 जून रोजी 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या प्रदर्शन तारखेबाबत उत्सुकता कायम आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित न पाहू शकलेले प्रेक्षक आता घरबसल्या या ऐतिहासिक कथानकाचा आनंद घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 130 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरल्याचे बोलले जात आहे. या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळाल्याचेही चित्रपटसृष्टीतील जाणकारांचे मत आहे.

'राजा शिवाजी' या Raja Shivaji चित्रपटात रितेश देशमुख यांनी केवळ मुख्य भूमिका साकारली नसून त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे प्रेक्षकांकडून सांगितले जात आहे. या चित्रपटात जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावल्याने चित्रपटाची चर्चा अधिक वाढली होती.दरम्यान, हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्य निर्मितीमूल्ये आणि स्टारकास्टमुळे 'राजा शिवाजी'ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, आता ओटीटीवर तो कितपत यश मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur