Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यस्तरीय सेपकटकरो शिबिरात ९५ खेळाडू

राज्यस्तरीय सेपकटकरो शिबिरात ९५ खेळाडू

वर्धा,

येथील अवधेश क्रीडा मंडळाच्या प्रांगणावर १६ ते ३० मे या कालावधीत राज्यस्तरीय Sepkatkaro Sports Camp सेपकटकरो क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल ९० ते ९५ उत्कृष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

या राज्यस्तरीय शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून सेपकटकरो या खेळाचे नामांकित एनआयएस कोच मनोज बनकर यांची नियुती करण्यात आली होती.

Sepkatkaro Sports Camp शिबिरादरम्यान बनकर यांनी सहभागी सर्व खेळाडूंना सेपकटकरो खेळाची पायाभूत माहिती, आवश्यक कौशल्ये आणि प्रत्यक्ष मैदानावर खेळाचे तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक करून दाखवले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत हे प्रशिक्षित खेळाडू आपापल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यत होत आहे. शिबिरादरम्यान अवधेश क्रीडा मंडळाचे सचिव डॉ. विनय मून यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सेपकटकरो खेळाची पृष्ठभूमी आणि या खेळाची सुरूवात कशी झाली, याबद्दलची माहिती दिली. तसेच, शिबिरात सहभागी सर्व खेळाडूंनी जिद्दीने आणि मन लावून सराव करावा, असे आवाहन केले. या शिबिरामुळे महाराष्ट्रात सेपकटकरो खेळाला एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून, खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur