Friday, 24 Sep, 8.17 pm तरुण भारत नागपूर

होम
रशियाच्या कुस्तीपटूवर चार वर्षांची बंदी

मॉस्को,

लंडन ऑलिम्पिकमध्ये 120 किग्रॅ फ'ी-स्टाईल स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकणारा रशियाचा कुस्तीपटू बिल्याल माखोव्ह याच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती रशियन डोपिंग विरोधी संस्थेने (रुसाडा) दिली. 34 वर्षीय बिल्यालच्या निलंबनाचा काळ 27 जानेवारी 2020 पासून गणल्या जाईल, असे रुसाडाने म्हटले आहे.

डोपिंग चाचणीत माखोव्हच्या नमुन्यात प्रतिबंधित उत्तेजक द्रव्यांचे अंश आढळून आले. या संदर्भात त्याला विचारणा केली असता तो पुराव्यासह स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरला, असे तास या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तीन वेळचा विश्वविजेत्या बिल्यालने प्रारंभी इराणच्या कोमेल घासेमीसोबत कांस्यपदक जिंकले होते, परंतु अंतिम फेरीतील आर्टूर तायमाझोव्ह व डेव्हिट मोडझमनाश्विली कुस्तीपटू डोपिंग चाचणी अपयशी ठरल्यामुळे दोघांच्या पदकांमध्ये बदल करण्यात आला व त्यांना सुवर्णपदक मिळाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur
Top