Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रीय अ‍ॅबॅकस ऑलिम्पियाडमध्ये गौरांग राठोड देशात चौथा

राष्ट्रीय अ‍ॅबॅकस ऑलिम्पियाडमध्ये गौरांग राठोड देशात चौथा

कारंजा लाड,

Gaurang rathod येथील गुणवंत विद्यार्थी गौरांग इंद्रसिंग राठोड याने राष्ट्रीय स्तरावरील 'नॅशनल अ‍ॅबॅकस ऑलिम्पियाड २०२६' स्पर्धेत देशात चौथा क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गौरांगने 'लेव्हल-२' गटात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कमी वेळेत अचूक गणिते सोडविण्याच्या कठीण कसोटीत गौरांगने उत्कृष्ट वेग आणि अचूकता दाखवत चौथा क्रमांक मिळविला. या यशामुळे कारंजा सह संपूर्ण वाशीम जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव झाला आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मेघना कीर्ती, आयटी उद्योजक विनोद जैन तसेच सुपर अ‍ॅबॅकसचे व्यवस्थापकीय संचालक मनीष महाजन यांच्या हस्ते गौरांगचा ट्रॉफी व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गौरांगच्या या यशामागे आदिव सुपर अ‍ॅबॅकस अकॅडमीच्या संचालिका दिक्षा अशोक वरघट यांचे मार्गदर्शन आणि त्याच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबद्दल दिक्षा वरघट यांनाही राष्ट्रीय स्तरावर 'सुपर परफॉर्मर अवॉर्ड २०२६' आणि 'इम्पॅट वुमन अवॉर्ड'सह एकूण चार राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.गौरांग राठोडच्या या उल्लेखनीय यशामुळे कारंजा मध्ये आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur