Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रस्त्याची चाळण, प्रशासन झोपेत

रस्त्याची चाळण, प्रशासन झोपेत

मारेगाव,

Chanoda chopan road मारेगाव तालुक्यातील चनोडाचोपणमार्डी हा महत्त्वाचा ग्रामीण मार्ग सध्या अक्षरशः उद्ध्वस्त झाला असून, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि खडबडीत पृष्ठभागामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, शेतकरी आणि रुग्णांची मोठी वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग मृत्यूचा सापळाच ठरत असल्याची भावना नागरिकांची आहे.

स्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक वाहनचालकांनी मारेगाववणी प्रवासासाठी पर्यायी मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. विकासाच्या घोषणा करणाèया प्रशासनाला प्रत्यक्षात या रस्त्याची दयनीय अवस्था दिसत नाही का, असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.

नागरिकांनी वारंवार निवेदने व मागण्या करूनही केवळ पाहणी आणि आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तात्पुरती डागडुजी नव्हे, तर दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ता बांधकाम तातडीने हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा तीव्र प्रश्न आता मारेगाव तालुक्यातून विचारला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur