Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेबीजमुळे सात वर्षीय मुलीचा मृत्यू

रेबीजमुळे सात वर्षीय मुलीचा मृत्यू

केरळ

Rabies death Kerala केरळमधील पुनालुर येथे एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याच्या एक वर्ष जुन्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. रेबीज संसर्गामुळे झालेल्या या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी चार सरकारी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने पुन्हा एकदा वैद्यकीय निष्काळजीपणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

पथनापूरम येथील निया फैसल या सात वर्षीय मुलीवर गेल्या वर्षी मे महिन्यात तिच्या घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तिला पुनालुर येथील सरकारी तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी तिरुवनंतपुरम येथील सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला.मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पुनालुर रुग्णालयातील डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली.

त्यावर सुनावणी करताना दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.पुनालुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी तालुका रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील कुमार, डॉ. देवी लक्ष्मी, डॉ. अंजिता आणि डॉ. जयसूर्या यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणा तसेच पुरावे नष्ट केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी आणि आपत्कालीन उपचार प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, संबंधित कागदपत्रे आणि उपचार प्रक्रियेची सखोल चौकशी केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur