Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रोटरी क्लबतर्फे विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण

रोटरी क्लबतर्फे विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण

हिंगणघाट,

Rotary club रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.

यावर्षी सुमारे ३०० महिला व युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थिनींची शासकीय डिप्लोमा प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन मुखी हॉस्पिटल येथे करण्यात आले होते.

यावेळी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी सतीश वखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर राशी अर्बन पतसंस्थाच्या व्यवस्थापक विभा कडू विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर रोटरी क्लब हिंगणघाटचे अध्यक्ष संदीप डेहणे, सचिव उदय बोकरे, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी उपस्थित होते.सतीश वखरे यांनी रोटरी क्लबच्या महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विभा कडू यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून प्रशिक्षणार्थींना स्वावलंबी बनून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक मुखी यांनी रोटरी क्लबच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती दिली.संचालन मुरली लाहोटी यांनी केले तर आभार माया मिहानी यांनी केले. यशस्वीतेसाठी निशा शर्मा, पितांबर चंदानी, मंजुषा मुळे, विद्या बोभाटे, शगुफ्ता पठाण, अशोक चंदनखेड़े आणि वैशाली वणीकर यांनी परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur