Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सज्जतेलाच सर्वोच्च प्राधान्य

सज्जतेलाच सर्वोच्च प्राधान्य

नवी दिल्ली,

Admiral Krishnaswaminathan वेगाने बदलणाऱ्या या प्रादेशिक सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर अ‍ॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन् यांनी रविवारी भारताचे नवीन नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.ते सेवेतून निवृत्त झालेले अ‍ॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यानंतर पदभार स्वीकारला आहे.

हे सर्वोच्च पद स्वीकारण्यापूर्वी अ‍ॅडमिरल स्वामीनाथन् पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यरत होते.

प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती सध्या आव्हानात्मक, गुंतागुंतीची आहे आणि कारवाईची सज्जता राखणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय हितसंबंध मग ते कुठेही असोत, त्यांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदल सदैव सतर्क आहे तसेच आव्हानात्मक, गुंतागुंतीचे अनपेक्षित आणि अनिश्चित अशा प्रादेशिक सुरक्षा वातावरणात ते अत्यंत सक्रियपणे तैनात आहे, असे स्वामीनाथन् यांनी पत्रकारांना सांगितले.

देशाची सुरक्षा आणि आर्थिक Admiral Krishnaswaminathan हितसंबंधांचे रक्षण व्हावे यासाठी भारतीय नौदल सर्वोच्च पातळीवरील कार्यसज्जता आणि युद्धक्षमता कायम राखेल, हे सुनिश्चित करणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे ते म्हणाले. भारतीय नौदल क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर भक्कमपणे अग्रेसर आहे. नौदलाच्या विकासाची गती कायम राखणे, सध्या सुरू असलेले सर्व कार्यक्रम बळकट करणे, जिथे आवश्यक असेल, तिथे त्यांच्या क्षमतांचा विस्तार करणे आणि विशिष्ट व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करून आपली कार्यक्षमता अधिक धारदार करणे, हा माझा प्रयत्न असेल, असे स्वामीनाथन यांनी सांगितले.

मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नौदलाला अधिक चांगली, अधिक मजबूत, अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावी सेवा बनवण्यासाठी समर्पित करेल. या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय आर्थिक समृद्धीच्या हिताची सेवा करू शकेल, असे स्वामीनाथन् म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक युद्धातील तज्ज्ञअ‍ॅडमिरल स्वामीनाथन् 1 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले. ते दळणवळण व इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रातील तज्ज्ञ आहेत. ते खडकवासलातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, जॉइंट सर्व्हिसेस कमांड अ‍ॅण्ड स्टाफ कॉलेज, ब्रिटनमधील श्रिवेनहॅम, करंजा येथील कॉलेज ऑफ वॉरफेअर, न्यूपोर्ट येथील यूएस नेव्हल वॉर कॉलेज या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur