Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समाजकार्याचा वसा, वाढदिवस निधी संकलनाद्वारे नवी दिशा

समाजकार्याचा वसा, वाढदिवस निधी संकलनाद्वारे नवी दिशा

मोहिनी घारपुरे देशमुख

Jayant parkhi पुण्यातील जयंत पारखी हे नाव आता घराघरात पोहोचत आहे. किर्लोस्कर कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर पारखी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी खर्ची घालण्याचे योजिले.

समाजकार्य करायचे म्हणजे विश्वासार्हता फार महत्त्वाची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या (ज्यात सर्व पेठांचा समावेश केलेला आहे) सेवाविभागाचे कार्य केले. त्यांनी पाहिले की आपल्याकडे सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांना वेळोवेळी आर्थिक मदतीची गरज असते. अनेक संस्थांकडे पुरेशी साधनसंपत्ती नाही, सोयी नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना त्यांचा कार्यविस्तार करता येत नाही.

अशा संस्थांना मदत करण्यासाठी काय बरे करता येईल असा विचार केला असता त्यांना वाढदिवस निधी ही एक अनोखी संकल्पना सुचली. आपण प्रत्येकजण स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या वाढदिवसाला वारेमाप खर्च करतो. त्यात खाणे, पिणे, कपडालत्ता आणि वाढदिवसाची परतभेट यावर बहुतांश पैसा आपण सढळ हस्ते खर्च करत असतो. मात्र, प्रत्येकाने जर आपल्या किंवा कुटुंबियांच्या वाढदिवसाला यथाशक्ती थोडीफार रक्कम समाजकार्यासाठी दिली तर त्याचा निश्चितच चांगला विनियोग होईल असा विचार पारखी यांच्या मनात आला आणि त्यांनी हाउपक्रम सुरु केला.पारखींनी हा विचार मांडल्यानंतर त्यास सुंदर प्रतिसाद येऊ लागला. कोणाकडेही न मागता, निधी उभारला जयंत पारखी जाऊ लागला. आजवर २७८ संस्थांना प्रत्येकी हजार रुपयांपासून आता जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत निधी देण्याचे कार्य वाढदिवस निधीच्या माध्यमातून दिले गेले आहेत. कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत हा निधी आजवर उभारला गेला आहे.या संपूर्ण कामात पारदर्शकता राहील याचीही काळजी पारखींनी घेतली आहे. हे सर्व आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचे निराळेस्वतंत्र खाते उघडले आहे. हे खाते जॉईंट अकाऊंट करून संघाचे कार्यकर्ते अविनाश सराफ यांच्याबरोबर उघडले. तसेच कॅश ट्रान्स्ॉक्शन अजिबात केले जात नाही. जीपे किंवा चेकनेच निधी स्वीकारला जातो. परिणामी हा सर्व कारभार अतिशय पारदर्शक झाला आहे.संस्थेची निवड करताना प्रत्यक्ष संस्थेला भेट देऊन तिथले कामकाज नीट पाहून परखून त्यानंतरच त्या संस्थेला निधी दिला जातो. समाजात अनेक प्रकारची सेवा कार्य चाललेली आहेत. अनेक वृद्धाश्रम, आधाराश्रम, अंध अपंगांना सांभाळणाऱ्या संस्था, बहिऱ्या मुलांची संस्था, हरवलेल्या, चुकलेल्या मुलांना सांभाळणारी संस्था अशा असंख्य संस्थांनाआज वाढदिवस निधीमुळे थोडाफार हातभार लागतो आहे. खात्री केल्याशिवाय कोणत्याही संस्थेला मदत केली जात नाही हे विशेष.या संपूर्ण कार्यात जयंत पारखी यांच्याबरोबर अविनाश सराफ, विकास रुखणे, रविंद्र चपळगावकर, महेश देशपांडे, प्रसाद जोशी, प्रमोद जोशी, नंदकुमार भुजाड, यशवंत ववले, श्रीधर गुणे, प्रवीण कुलकर्णी आणि मुकुंद काळे अशी टीम या कामी मोठ्या उत्साहाने हातभार लावत आहेत. वाढदिवस निधी ही संकल्पना ज्यांना आवडेल ते सगळेजण यात सहभागी होऊ शकतात, किंबहुना ही कल्पना आपणही वैयक्तिकरित्या राबवू शकतो हीच प्रेरणा जयंतजींकडून आपण घ्यायला हवी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur