Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामरा नगरातील कुंटणखाण्यावर धाड

सामरा नगरातील कुंटणखाण्यावर धाड

अमरावती,

Amravati-crime : राजापेठ पोलिसांनी सामरानगर येथील कुंटणखाण्यावर धाड टाकून देहविक्रीचा व्यवसाय उजेडात आणला. पोलिसांनी सूत्रधार महिलेसह देहविक्री करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले.

राजापेठचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना बुधवारी माहिती मिळाली की, साई दर्शन सोसायटी, सामरानगर येथे फ्लॅट क्रमांक ४०२ मध्ये कुंटणखाणा सुरू आहे. ते लगेच आपल्या संपूर्ण चमूसह घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना सुशांत पळसपगार (रा. हिंगासपुरे नगर), मंगला पळसपगार (रा.

गोदावरी कॉलनी) हे कुंटणखाणा चालवीत असल्याचे दिसून आले. याशिवाय तेथे अन्य तीन महिला आढळून आल्या. त्यांच्याबाबत आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी या महिलांना वेश्या व्यवसायाकरिता आणल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur