Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

कंटेनर चालकाचा मृत्यू

मंगरूळनाथ,

Accident on Samruddhi Expressway समृद्धी महामार्गावर ३० मे रोजी झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुय्यम क्षेत्र शेलूबाजार येथे कार्यरत शिपाई गजानन नारायण मेंढे हे कर्तव्यावर असताना समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोनि किशोर शेळकेसह चरण चव्हाण, जाधव, जमादार नाईक व शिपाई सचिन धवणे यांच्यासह ते घटनास्थळी पोहोचले. तेथे कंटेनर क्रमांक टीजी ०८ टी ०८१३ रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून आलेल्या युपी ७० पीटी ०३३८ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला.

Accident on Samruddhi Expressway जखमी चालकाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, मंगरूळनाथ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. वाहनातील कागदपत्रांची तपासणी केली असता मृत चालकाचे नाव कैलास जलाधर दास (वय ४४) रा. घोलमारा आसाम असल्याचे समोर आले. अपघातातील आयशर वाहनाचा चालक सुभेदार हरीशचंद्र पाल (वय ३०) रा. तिल्हापुर, ब्लॉक नेवादा, पोलीस स्टेशन सरायकील, तहसील चायल, जि. कौशांबी, उत्तर प्रदेश येथील असून, त्याने निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगरूळनाथ पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखली जमादार विजय डोंगरे करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur