Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संकल्प स्मरण ध्येयापासून कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये : भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

संकल्प स्मरण ध्येयापासून कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये : भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

पंडीत दिनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण वर्गाचे थाटात उदघाटन

बुलढाणा,

Pandit dindayal upadhyay prashikshan shibir भारत नावाच्या वस्त्राचा प्रमुख उभा धागा प्रभू रामचंद्र आहे. त्यातून सभ्यता संस्कृतीचा प्रवास धर्मरक्षणासाठी केला गेला.

वस्त्राचा काठ भगवान शकरांचा आहे. आपली भूषा भवन, भोजन, भाषा वेगवेगळी असली तरी राष्ट्रहिताचा विचार भारत माता की जय चा भाव प्रत्येकाच्या मनात आहे. या भावनेतूनच संकल्प स्मरण ध्येयापासून कार्यकर्ता कधीच विचलित होत नाही. पंडित दिनदयाल उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी अटलजी यांच्या विचारधारेवर आधारीत भारतीय जनता पक्षाची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक संकटकाळात यशस्वीरित्या पार पाडली असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केले.

पंडीत दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण दोन दिवसाचे महाशिबिराचे उदघाटन बुलढाणा अर्बन रेसेडेन्सी येथे दि. ३० मे रोजी पार पडले. याप्रसंगी आपले वैचारिक अधिष्ठान विषयावर मार्गदर्शन करतांना शिवराय कुळकर्णी बोलत होते. व्यासपीठावर बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आ. श्वेता महाले, जिल्हा प्रभारी जयंत डेहनकर, डॉ. गणेश मांटे, तोताराम कायंदे, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, हभप प्रकाशबुवा जवंजाळ, भाजप प्रवक्ते विनोद वाघ, उल्हासराव देशपांडे, सरचिटणीस दत्ता पाटील, अभियान संयोजक चंद्रकांत बर्दे, प्रकाश गवई, युवराज भुसारी, शैलेश मुंढे व्यासपीठावर उपस्थित होते.

pandit dindayal upadhyay prashikshan shibir प्रारंभी दिपप्रज्वलन पंडीत दीनदयाल उपाध्याय, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वंदे मातरम, महाराष्ट्र गीत, सामूहिकरित्या सादर करण्यात आले. वैयक्तिक गीत श्रीकृष्ण सपकाळ यांनी सादर केले. महाशिबिराच्या पहिल्या सत्रात बोलतांना शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात आलेल्या संकटावर यशस्वीरित्या मात केली. आता आखाती युद्धामुळे दुसरे संकट समोर असतांना त्यांनी जनतेला आवाहन केले. परकीय चलान वाढवू नका, सोने खरेदी करू नका विरोधकांनी नेहमीप्रमाणे अराजकता पसरविण्यसाठी टिका केली. दुसरीकडे एका विकृत व्यक्तीने देशाला झुरळ म्हटले विरोधकांनी हि संधी उचलून धरली त्यातून त्यांची देशविरोधी मानसिकता लक्षात येते. त्याउलट संकटाच्या काळात शामाप्रसाद मुखर्जी, अटलजींनी एकही वक्तव्य सत्ताधारांच्या विरोधात व्यक्त केले नाही. अलिकडच्या काळात काँग्रेस पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. परंतू भाजपचा कार्यकर्ता राष्ट्र प्रथम या भावनेतून पक्षाचे एकनिष्ठपणे काम करीत आहे. त्या आधारावर आपले वैचारिक अधिष्ठाण टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सक्षम कार्यकर्ता घडविण्यासाठी प्रशिक्षणाची बदलत्या काळात आवश्यकता असून अपेक्षित पक्षसंघटन निर्माण झाल्याने देशात भाजप क्रमांक एक चा पक्ष आहे. संघटन टिकून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक चंद्रकांत बर्दे, संचलन मंदार बाहेकर, श्रीकृष्ण सपकाळ यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur