Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सरस्वती विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

सरस्वती विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

नागपूर,

Saraswati Vidyalaya शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका डॉ. रेशमी उमेश, उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक रवींद्र कुलकर्णी व राहुल घोडे यांच्या हस्ते गुरु वेदव्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थी अनिकेत कोल्हेकर यांनी वेदव्यासांचा वेश धारण करून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विषद केले. डॉ. रेशमी उमेश यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पालक व गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे संचालन मेघा व्यास यांनी केले. दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

सौजन्य : अनघा पेंडके ,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur