Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावधान! मोमोज खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा

सावधान! मोमोज खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा

मुंबई

Momos food poisoning कुर्ला पश्चिमेतील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर १४ जणांना अन्नातून विषबाधेचा त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोमोज खाल्ल्यानंतर संबंधितांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

विषबाधेचा त्रास झालेल्या सर्व १४ जणांना रविवारी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यापैकी सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्य रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.यातील दोन जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंता निर्माण झाली होती.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिगे यांनी भाभा रुग्णालयात जाऊन विषबाधेचा त्रास झालेल्या रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांवर करण्यात येत असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहितीही त्यांनी घेतली.मोमोज खाल्ल्यानंतर एकाच वेळी १४ जणांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर यांसारखी लक्षणे जाणवल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर संबंधित अन्नपदार्थामुळेच विषबाधा झाली का, याबाबतच्या तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur