Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सावली वनपरिक्षेत्रात हत्तीचे पुन्हा आगमन

सावली वनपरिक्षेत्रात हत्तीचे पुन्हा आगमन

सावली

Elephant returns गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या 32 रानटी हत्तींच्या कळपाने सावली वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. वैनगंगा नदी पार करून हत्तींच्या कळपाने करोली-गेवरा -आकापूर जंगल परिसरात मुक्काम ठोकल्याचे दिसत आहे.

हत्तींचा अवाढव्य समुह ठाण मांडून बसल्याने परिसरातील गावकर्‍यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. यामुळे शेत पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. सावली तालुक्याच्या सिमेवरील वैनगंगा नदी ओलांडून वनपरिक्षेत्रात दाखल झालेल्या हत्तींच्या आगमनाची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी हत्तींच्या हालचालीवर करडी नजर ठेवून आहे, मानवी वस्तीत हत्तींचा प्रवेश रोखण्यासाठी गस्त घातली जात आहे. शेतात उभे पिक असल्याने शेतकरी वर्गात चिंतेत वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱी व शेतकर्‍यांनी एकट्याने बाहेर पडु नये, जंगल परिसरात जाऊ नये, हत्ती दिसल्यास ओरडू नये व डिवचण्याचा प्रयत्न करु नये, लागलीच वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur