Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सेलू तालुका कोरड्या दुष्काळाच्या चक्रात

सेलू तालुका कोरड्या दुष्काळाच्या चक्रात

विजय माहुरे

सेलू,

Selu-taluka यावर्षी पावसाळा जाणवलाच नाही, अशी परिस्थिती असतानाच रोहिणी ते उत्तरा नक्षत्रात आलेल्या रिमझिम पावसामुळे सेलू तालुयात कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना अशी भीती व्यत केली जात आहे.

सेलू बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. येथे ओलिताची शेती केली जात असून येथे खरीप अन् रब्बी हंगामात दोन पिकं घेतले जातात. त्यापैकी खरीप हंगामात सोयाबीन बहुतांश शेतकरी घेतात तर कपाशीचे लागवड क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आहे. अल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पिकं सुकत आहेत तर उन्हाच्या दहाकतेने कोमेजून जात आहे. अशातच केळी, फळबागा व रब्बीतील पिकांना विहिरीचे पाणी साठा साथ देणार काय हा प्रश्न भेडसावत असल्याने या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

सेलू तालुयात बोर नदी व धाम नदी वाहते. पण, बोर नदीचा पावसाळ्यातही प्रवाह सुरू झाला नाही. त्यामुळे नदी, शेत शिवारातील नाले कोरडे पडले आहे. शेतातील विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेली आसे. पुढे दमदार पाऊस आला नाही तर विहिरीत पाणी येणार कोठून याची चिंता वाढली आहे. सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडली असून काही शेतकर्‍यांना सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याची आशा असली तरी बहुतांश शेतातील सोयाबीनवर रोग आल्याने नुकसानीची शयता वाढली आहे. तर जमिनीत ओलावा नसल्याने कपाशीचे पीक संकटात सापडले आहे.

आता हस्तवर भीस्त

रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरू होतो. यात मृग व आर्द्रा नक्षत्रात पेरण्या होतात. उत्तरा नक्षत्रापर्यंत येणार्‍या पावसावर खरीप हंगाम घेतला जातो. पण, उत्तरा नक्षत्र सुरू असून याही नक्षत्राने पाठ फिरविली आहे. हस्त नक्षत्र सात दिवसावर आहे. हस्त नक्षत्रही पाण्याशिवायच जाण्याची शयता वर्तवली जात आहे. त्यामुुळे आता कोरड्या दुष्काळाचे तर सावट अजून गडद होत आहे.

जिल्ह्यातही सावट

जिल्ह्यातील आठही तालुयांत पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी व रोगामुळे अनेक भागातील सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट येणार आहे. कोरडवाहू कपाशी पिकाची स्थिती देखील तशीच आहे. पाणीपातळी न वाढल्याने रब्बी हंगामातील पिके होणार की नाही, अशी चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नातून रब्बी हंगामाची तयारी आणि दिवाळीचा सण शेतकरी साजरा करतात. परंतु, सोयाबीनचे उत्पादनच न झाल्यास दिवाळीसुद्धा अंधारात जाईल, असे शेतकरी बोलत आहेत. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur