Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सेलूत विद्यार्थी असलेला ऑटो उलटला

सेलूत विद्यार्थी असलेला ऑटो उलटला

सेलू,

Auto-rickshaw-overturns : सुरगाव-सेलू मार्गावरील अपूर्ण रस्त्याचे काम आणि रस्त्यावर पडून असलेल्या गिट्टीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा ऑटो उलटला. यात एका विद्यार्थ्याचा हात जायबंदी झाला.

एक विद्यार्थी गंभीर तर चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज मंगळवार ४ रोजी सकाळी किनकर कॉलेजजवळील पुलावर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाव येथील गोलू कंगाले हा एम. एच. ३१ सी. व्ही. ७४०१ क्रमांकाच्या ऑटोमधून दीपचंद चौधरी विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना घेऊन सेलूकडे येत होता. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास किनकर कॉलेजजवळील पुलावर रस्त्यावर साचलेल्या गिट्टीत ऑटोचे पुढील चाक रुतल्याने ऑटो रस्त्यावर उलटला.

या अपघातात आदित्य प्रशांत पाटील (१५) रा. सुरगाव या विद्यार्थ्याचा हात फ्रॅचर झाला. त्याला तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या हाताच्या हाडाचे दोन तुकडे झाल्याचे डॉटरांनी सांगितले. श्रेयस विनोद पुनवटकर रा. सुरगाव याच्या पायात गिट्टीचे तुकडे घुसल्याने त्यालाही गंभीर दुखापत झाली. अन्य जखमी विद्यार्थ्यांवर सेलू ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. अपघातानंतर संबंधित कंत्राटदाराने घटनास्थळी बारीक चुरी टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात आहे. सुरगाव-सेलू मार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असून गिट्टीमुळे वाहनचालकांचा जीव धोयात आला आहे. विशेष म्हणजे, आजच सकाळी पॉवर हाऊसच्या प्रवेशद्वारासमोर एका महिला कर्मचार्‍याचा अपघात झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur