Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शायरीचा बुलंद आवाज शांत

शायरीचा बुलंद आवाज शांत

भोपाळ

Bashir Badr सुप्रसिद्ध उर्दू शायर आणि आधुनिक गजलकारांमधील अग्रणी नाव असणारे शामिल बशीर बद्र यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने साहित्य, उर्दू संस्कृती आणि मुशायरा जगतात तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.

Bashir Badr बशीर बद्र यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तरप्रदेशातील अयोध्येत झाला. त्यांनी आधुनिक उर्दू गजल साधारण भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या शायरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कधीही कठीण उर्दू शब्द नसायचे, तर अगदी दैनंदिन जीवनातील भाषेचा वापर करून ते अगदी गंभीर विषयावरही काव्य गुंफायचे. उर्दू भाषेतील जड शब्द काढून थेट काळजाला भिडणारी शायरी त्यांनी सादर केली. जीवनाचा साधेपणा त्यांच्या शायरीचा अविभाज्य भाग होता.

Bashir Badr पद्मश्रीने सन्मानित बशीर बद्र यांना उर्दू साहित्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. भारतच नव्हे तर पाकिस्तान, अमेरिका, दुबई, कतारसह अनेक देशांमधील मुशायरा कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला. गेल्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर झाले होते. त्यांना विस्मृतीचाही त्रास झाला. कायम लोकांच्या गराड्यात राहणारा हा शायर अखेरच्या दिवसात अतिशय एकाकी जीवन जगला आणि त्याच एकाकीपणात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur