Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा : आ. कुणावार

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा : आ. कुणावार

समुद्रपूर,

Samir Kunawar नैसर्गिक संकटामुळे दिवसेंदिवस उत्पादन घटत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारीच्या खाईत ओढला जात आहे. यातून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने योग्य कृषी निविष्ठा मिळावी यासाठी विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन करून शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिले.

जाम येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित २०२६-२७ हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे, उपविभागीय कृषी अधिकारी तोरणे, तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकारे, डॉ. वदिले, आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शेतकरी व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांचा आ. कुणावार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

आमदार कुणावार पुढे म्हणाले की, दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पिकांना कवच मिळण्यासाठी १०० टके पीक विमा काढण्यासाठी जनजागृती करावी. सन २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये पीक विमा काढण्यात ६४ टके घट झाली आहे. यासंबधी त्यांनी चिंता व्यत केली. भारत कृषिप्रधान देश आहे. ७० टके लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत शेतीसंबंधी तंत्रज्ञान पोहचले पाहिजे. जमिनीची आरोग्य तपासणी करावी. शेती माती पत्रिकेनुसार खताच्या मात्रा दिल्यास शेतकर्‍यांचा विनाकारण खर्च वाचेल. कृषी सहाय्यकांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचून गावात शेती शाळा घेऊन शेती संबंधी तसेच सरकारच्या विविध कृषी संबंधी योजनांची माहिती द्यावी, शेतकर्‍यांना चांगल्या प्रतिचे बियाणे, खते कृषी निविष्ठा मिळाल्या पाहिजे, शेतकर्‍यांची कुठेही फसवणूक होता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे म्हणाले की, शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न व्हावे यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी माईक्रो पॅन करून शेतकर्‍यांना जगविणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या दारात जाऊन शेतीसंबंधी योग्य माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur