Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिकवणी वर्गातून विद्यार्थिनी बेपत्ता

शिकवणी वर्गातून विद्यार्थिनी बेपत्ता

अनिल कांबळे,

नागपूर,

Female-student-goes-missing : सदर परिसरातील जेईई परीक्षेसाठी लावलेल्या शिकवणी वर्गातून १६ वर्षीय विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सदर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने दहा दिवसांपूर्वी सदर येथील एका शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता. २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता तिचे वडील तिला क्लासमध्ये सोडून कामावर गेले. दुपारी २ वाजता कुटुंबातील एक सदस्य तिला घेण्यासाठी कोचिंग सेंटरमध्ये गेला असता ती तेथे आढळून आली नाही. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजता तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून आईला फोन करून, "घरी यायला उशीर होईल," असे सांगितले. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणींकडे तसेच ती जाऊ शकणाऱ्या विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी सदर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur