Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिरोली येथे जपानी पद्धतीने भातशेती लागवड

सिरोली येथे जपानी पद्धतीने भातशेती लागवड

तभा वृत्तसेवा

अर्जुनी मोर,

तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागला आहे. तालुक्यातील सिरोली येथील अनेक शेतकरी जपानी पद्धतीने भातशेतीची लागवड करून अधिक उत्पन्न घेत आहेत.

सिरोलीमध्ये एकूण क्षेत्राच्या 60 टक्के क्षेत्रात भातशेती रोवणी केली जाते. गावाचे भात पिकाखालील क्षेत्र 275 हेक्टर आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी 60 टक्के क्षेत्रावर जपानी पद्धतीने भात शेती लागवड केली आहे. इटियाडोह प्रकल्पाच्या सिंचनाचा लाभ घेऊन परिसरातील शेतकरी समृद्ध होत आहे.

जपानी पद्धतीने लागवड करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये नीताराम मस्के, प्रदीप मस्के, अनिल मस्के, रमेश मस्केचा समावेश आहे. या शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनात परिसरातील शेतकरी आता जपानी पद्धतीने भातपीक लागवड करू लागले आहेत. जपानी पद्धतीने भात शेती केल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतकर्‍यांना कीटकनाशके फवारणी व खते देणे या पद्धतीने सोपे जाते. फुटव्यांची संख्या जास्त आल्याने पारंपारिक भातपीक लागवडी पेक्षा उत्पादनात वाढ होऊन शेतकर्‍यांना अधिक नफा मिळतो. तालुक्यातील शेतकर्‍यांनी जपानी भातपीक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक यशवंत कुंभरे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur