Dailyhunt
सुधीर मुनगंटीवार आज वर्धेत; सरस्वती भींतीचित्र आकर्षण

सुधीर मुनगंटीवार आज वर्धेत; सरस्वती भींतीचित्र आकर्षण

वर्धा,

Sudhir mungantiwar महाराष्ट्र दिनानिमित्त वर्धा शहरात विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे माजी वित्त, नियोजन व वनमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवार १ रोजी होणार आहे.

१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे आयोजित सरस्वतीच्या प्रतिमा अनावरण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारत सरकारचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, रातुम नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर राहतील.

अध्यक्षस्थानी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश भोयर राहतील. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. धीरज भोयर यांची उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता नालवाडी ग्रापं क्षेत्रातील लहरीनगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खा. माया इवनाथे, खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाणे, आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण तसेच विशेष अतिथी म्हणून माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६.३० वाजता स्टेशनफैल शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज राजदरबार म्युरलचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. भोयर राहतील.sudhir mungantiwar प्रमुख पाहुणे म्हणून खा. माया इवनाथे, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नप उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेविका राखी पांडे, जयश्री आगरकर आदी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते व अंत्योदय प्रतिष्ठानचे विरू पांडे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur