Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्वच्छ नागपूरसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

स्वच्छ नागपूरसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

शहर स्वच्छतेसाठी एकत्रित काम करणार

महापौर निता ठाकरे यांचे आवाहन

५ ते २१ जूनपर्यंत विशेष अभियान

नागपूर,

Clean Nagpur: Cooperation is Essential महानगरपालिकेतर्फे ५ जून पर्यावरण दिनापासून ते २१ जून योग दिनापर्यंत व पंधरवाडा' साजरा करण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, यादरम्यान नागरिक, पदाधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या अभियानात स्वयंसेवी संस्थांसह सर्वांचे सहकार्य आवश्यक असून एकत्रित काम करून शहराला स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, आवाहन महापौर निता ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केले.

शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात झाली. यावेळी बैठकीत स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता नरेंद्र बोरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार,क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर मनपाचे झोनल अधिकारी यांच्यासह मनपाचे ब्रॅड अ‍ॅम्बसेडर आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, मनपाचे ब्रॅड अ‍ॅम्बसेडर व तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा आदी उपस्थित होते.विविध स्पर्धेचे आयोजननागपूर महानगरपालिकातर्फे ५ जून रोजी वृक्षारोपण, ६ जून रोजी तलावाची सफाई, ७ जून रोजी सायकल रॅली, ८ जून रोजी उद्यानाची स्वच्छता, ९ जून मैदानाची स्वच्छता, १० जून रोजी धार्मिक स्थळाची स्वच्छता, ११ जून रोजी बाजार, वाणिज्य , मॉल, मंडी यांची स्वच्छता, १२ जून रोजी घाटांची स्वच्छता, १३ जून रोजी वाहनतळाची स्वच्छता, १४ जून रोजी ई-वेस्ट गोळा करण्याची विशेष मोहिम, १५ जून रोजी स्वच्छता, १६ जून रोजी सोसायटी, मोहल्ला, रहिवासी क्षेत्राची स्वच्छता, १७ रोजी हेरिटेज प्लेस, टूरिस्ट प्लेस स्वच्छता, १८ जून रोजी वस्त्यांची स्वच्छता, १९ जून रोजी बीडब्ल्यूजी वर्कशॉप, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, २० जून रोजी योगा केंद्राची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योगा दिन साजरा करून विशेष स्वच्छता मोहिमेत भाग घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे याबाबत समिती सभापती शिवाणी दाणी यांनी माहिती दिली.नागरिकांमध्ये जनजागृती करायावेळी महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, मनपातर्फे ५ जून ते २१ जून या पंधरवाड्यात विशेष जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नागपूर शहराला स्वच्छतेच्या रॅकमध्ये आणण्याकरिता आणि नागपूर शहर स्वच्छ पर्यावरण दृष्ट्या शहराला अधिक चांगले करण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मोठी होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले.विशेष स्वच्छता अभियानClean Nagpur: Cooperation is Essential स्थायी समिती सभापती यांनी स्थानिक नगरसेवक, एनजीओ यांच्या सहकार्याने ५ जून पासून सुरु होणार्‍या विशेष स्वच्छता अभियानात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह मोहिमेत १ किलो प्लास्टिक मनपाला द्या अशी योजना अंमलात आणली असे त्यांनी सांगितले. तसेच या मोहिमेमध्ये एनसीसी, एनएसएस, नागपूर विद्यापीठाची मदत घेतली जाणार शिवाय स्वयंसेवी संस्था ज्या ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत त्याबाबत मनपाला माहिती देण्यात यावी, त्या सूचना त्यांनी संस्थांना केल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur