Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्वर गंधर्वतर्फे 'छोटा सा बालमा...' स्वरांजली कार्यक्रम ११ जुलैला

स्वर गंधर्वतर्फे 'छोटा सा बालमा...' स्वरांजली कार्यक्रम ११ जुलैला

नागपूर,

Chhota sa balma swaranjali program स्वर गंधर्व समूहातर्फे भारतरत्न स्व. आशा भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'छोटा सा बालमा...' या स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि.

११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मोरभवन येथील 'उत्कर्ष' सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात स्वर गंधर्वच्या ज्येष्ठ गायिका निलिमा मोहिते आणि रुपा मेश्राम यांच्यासह सीमा सोनुले, खुशाली कोडापे, रोहिणी पाटणकर, वैशाली प्रयागी, राजश्री शालिग्राम, मंजिरी बनहट्टी, सारिका कविश्वर, अरुंधती मांडवगडे, दीपाली सप्रे, स्मिता ब्रेंद्रे, शिल्पा खानझोडे, तसेच प्रकाश कुलकर्णी, डॉ. प्रविण जाधव आणि मिलिंद काळविट हे कलाकार स्व. आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या निवडक गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन नयना जोशी-गाथू करणार असून तांत्रिक सहाय्य संजय कुलकर्णी यांचे असणार आहे. या संगीतमय स्वरांजली कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अनंत नाईक यांनी केले आहे.

सौजन्य: अनंत नाईक, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur