Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तननाशक व कीटक नाशकाची फवारणी करा

तननाशक व कीटक नाशकाची फवारणी करा

सेलू,

Weeds and insects पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना पावसाळ्यात करावयाची कामे नगर पंचायतने केली नसल्याने नगर पंचायत प्रशासनाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन त्या बाबीकडे लक्ष वेधले.

सेलू शहर स्वच्छ व सुंदर असल्याचे मानांकन मिळाले खरे पण प्रत्यक्षात सेलू शहरात दिवसागणिक समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस मुसळधार नसला तरी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे शहरात खाली जागेवर गवत वाढले आहे. झुडपं वाढत आहे त्या मुळे कीटकाचे प्रमाण वाढत असून सरपटणारे प्राणी वास्तव्यास आहे. त्याचा धोका नागरिकांना होऊ नये म्हणून गवताचा नायनाट करण्यासाठी तन नाशक व कीटक नाशकाची फवारणी करावी असे निवेदन नगर पंचायतचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना देण्यात आले आहे.यावेळी वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सचिव संजय जयस्वाल, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष दिनेश कामिनीकर, सेलू शहर भाजपाचे अध्यक्ष ओमदेव सावरकर, शिवा डुकरे, धीरज पवणारकर, अनिल घोडखांडे, निलेश साटोणे, विनोद बेदरकर, आदींची उपस्थिती होती

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur