Dailyhunt
ठाकूर यांची बदली रद्द, गभणेंना पुन्हा ठाणेदारपदी रुजू होण्याचे आदेश

ठाकूर यांची बदली रद्द, गभणेंना पुन्हा ठाणेदारपदी रुजू होण्याचे आदेश

सेलू,

Devendra thakurs transfer सेलू येथील पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदावरील बदलीबाबत अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत देवेंद्र ठाकूर यांची बदली रद्द केली. पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांना पूर्ववत सेलूचे ठाणेदार म्हणून रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी सेलू येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले मनोज गभणे यांची अचानक बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी देवेंद्र ठाकूर यांची नियुती करण्यात आली होती. या कारवाईविरोधात गभणे यांनी न्यायालयात धाव घेत बदली आदेशाला आव्हान दिले होते.devendra thakurs transfer चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व कागदपत्रे, नियम व दोन्ही बाजूंचे युतिवाद ऐकून गभणे यांची बदली नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करीत बदली आदेश रद्द केला. त्यांना पुन्हा सेलू ठाणेदारपदी रुजू करण्याचे निर्देश दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur