Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टी-२०चा नवा बादशाह ठरणार बटलर?

टी-२०चा नवा बादशाह ठरणार बटलर?

नवी दिल्ली,

Jos-buttler : अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने ३१ जुलै रोजी 'द हंड्रेड लीग'मध्ये ट्रेंट रॉकेट्सविरुद्ध ५५ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे तो टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्यापासून केवळ २४ धावा दूर आहे.

मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरने 'द हंड्रेड'च्या चालू हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून, या सामन्यात आपल्या संघाला १३७ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. बटलरने ३७ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि चार षटकारांसह ५५ धावा केल्या.

बटलर किरोन पोलार्डचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर

आपल्या प्रभावी फलंदाजीच्या विक्रमामुळे जोस बटलरला टी२० क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. बटलरने अलीकडेच ख्रिस गेलला मागे टाकत, सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आता, अव्वल स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजच्या कायरोन पोलार्डला मागे टाकण्यासाठी बटलरला फक्त २४ धावांची गरज आहे. जोस बटलरने आतापर्यंत ५२० टी२० सामने खेळले असून, ४९० डावांमध्ये फलंदाजी करताना ३५.४४ च्या सरासरीने १४,७८० धावा केल्या आहेत. सध्या अव्वल स्थानी असलेल्या कायरोन पोलार्डच्या नावावर १४,८०३ धावा आहेत.

टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) - १४८०३ धावा

जोस बटलर (इंग्लंड) - १४७८० धावा

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - १४५६२ धावा

ॲलेक्स हेल्स (इंग्लंड) - १४४४९ धावा

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - १४२८४ धावा

सलग दोन पराभवानंतरही मँचेस्टर सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर कायम

'द हंड्रेड'च्या चालू हंगामात आतापर्यंत चौदा सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेतील मँचेस्टर सुपर जायंट्सच्या स्थानाकडे पाहिल्यास, चार सामन्यांमध्ये दोन विजय आणि दोन सलग पराभवानंतर, ते ०.६१० च्या नेट रन रेटसह ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे, उर्वरित चार सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतील, कारण त्यांमधील दमदार कामगिरी त्यांना थेट अंतिम फेरीत स्थान मिळवून देऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur