Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रेलरची बसला धडक; तीन ठार, २५ जखमी

ट्रेलरची बसला धडक; तीन ठार, २५ जखमी

जयपूर,

Nashik-pilgrims-jaipur-bus-accidentजयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. बागरू पुलावरून खाली उतरत असताना बसस्थानकाजवळ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला एका ट्रेलरने धडक दिली.

यात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर जयपूरमधील एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. पाेलिसांनुसार, हा अपघात पहाटे सुमारे १:४५ वाजता झाला़ माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या बसमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भाविक प्रवास करत होते.

खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन ते चित्तोरगड येथील सांवरिया सेठ मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला़ ओव्हरटेक करण्याच्या नादात ही घटना घडली़ या बसमध्ये २९ प्रवासी हाेते़ अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पोलिसांना स्थानिकांनी मदत केली. संदीप सिंग, दीपक सिंग आणि महेंद्र सिंग, अशी मृतकांची नावे आहे़ जखमींमध्ये सुमित्रा, जयकुमार, सुनील सिंग, धनू बाई, संगीता, मंगल सिंग आणि लाल सिंग यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur