Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रेलरनंतर देशभर घुमणार 'मिर्झापूर: द मूव्ही'चा जलवा

ट्रेलरनंतर देशभर घुमणार 'मिर्झापूर: द मूव्ही'चा जलवा

मुंबई

Mirzapur अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'च्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करत या बहुचर्चित फ्रँचायझीच्या मोठ्या पडद्यावरील प्रवासाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.

या टीझरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा आपल्या गाजलेल्या भूमिकांमध्ये दिसत असून, 'मिर्झापूर'ला वेगळी ओळख मिळवून देणारा अॅक्शन, इंटेन्स ड्रामा आणि दमदार कथानक यावेळीही तितक्याच प्रभावीपणे अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानुसार, ११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनल मोहिमेला सुरुवात करणार आहे. यासाठी निर्मात्यांनी ७ ते ८ शहरांमध्ये विशेष मल्टी-सिटी ट्रेलर लॉन्च रोड ट्रिपचे नियोजन केले आहे. या दौऱ्यादरम्यान चित्रपटातील प्रमुख कलाकार देशभरातील विविध शहरांना भेट देत चाहत्यांशी संवाद साधणार असून, थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'मिर्झापूर: द मूव्ही'चा भौकाल थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा यांच्यासह अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सर्व कलाकारांच्या उपस्थितीमुळे 'मिर्झापूर'च्या विश्वातील एक नवे आणि रोमांचक पर्व मोठ्या पडद्यावर साकारले जाणार आहे.

'मिर्झापूर: द मूव्ही'ची प्रस्तुती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment करत आहेत. गुरमीत सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, पुनीत कृष्णा यांनी त्याचे लेखन केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रानी हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत चाहत्यांमधील उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur