Dailyhunt
'तुझा फोटो व्हायरल करेल...' आणि युवतीने उचलले धक्कादायक पाऊल

'तुझा फोटो व्हायरल करेल...' आणि युवतीने उचलले धक्कादायक पाऊल

पुणे,

Crime-news : बाणेर भागात तरुणाच्या त्रासामुळे अल्पवयीन युवती साक्षी शिवाजी आवटे (वय १७) ने उडी मारून आत्महत्या केली. आरोपी तरुणाने तिला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी युवतीच्या भावाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, आरोपी गोरख सुग्रीव गोरे (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, युवती शेजारी राहणाऱ्या तरुणाशी बोलत होती, त्यावेळी आरोपीने तिला सतावले आणि धमकी दिली. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास युवतीने इमारतीतून उडी मारली. पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur